वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
१२.५ % भूमी विभागाची "पारदर्शक प्रशासन" योजना काय आहे ?
निर्णय प्रक्रिये मध्ये पारदर्शक्ता आणने साठी सिडको ने कालबद्द कार्यक्रम तयार केला आहे. प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या संचिकेची सध्यस्थिती जाणून घेण्यासाठी किंवा ती पाहणेसाठी सिडको कार्यालयाला वारंवार भेटी द्याव्या लागत होत्या. संचिका दाखवणेची कार्यवाही व्यक्ति निर्भर राहू नये या करिता "१२.५ % संचिकांचे" स्कॅनिंग करण्यात आले आहे. या सर्व संचिका टचस्क्रिन किओस्क मध्ये आपलोड करण्यात आले आहे.
टच स्क्रीन किओस्क म्हणजे काय आहे ?
टच स्क्रीन किओस्क हे बोटांच्या स्पर्शाने चालणारा संगणक आहे. सिडको मध्ये आल्या नंतर नागरिकांना आवश्यकती स्कॅन झालेल्या संचिकेची माहिती सहजपणे उपलब्ध करून देण्याची सुविधा टच स्क्रीन द्वारे देण्यात आली आहे.
किओस्क वापरण्यासाठी संगणकाचे ज्ञान असणे आवशक आहे का ?
पायाभूत संगणकाचे ज्ञान असलेली व्यक्ती टच स्क्रीन किओस्क वापरु शकतात. आपण बँक एटीएम चा ज्याप्रमाणे वापर करता त्याच प्रमाणे या किओस्क चा वापर करता येईल.
किओस्कचा वापर कसा करावा ?
किओस्कचा वापर सहज व सरल पद्धतीने करता येतो. यामध्ये अनेक विकल्प दिले आहेत. आपणास विकल्प निवडून माहिती पाहता येईल, तसेच कीबोर्ड आणि स्क्रोल बॉल (माऊस) चा वापर करून देखील माहिती पाहू शकता. किओस्कचा वापर कसा करावा या साठी मुख्य पानावर फिल्म पाहु शकता.
किओस्क बनवण्याचे उदिष्ट काय आहे ?
या प्रयोजनांतर्गत स्कॅन झालेल्या संचिका सहजपणे नागरिकांना पहाण्यासाठी उपलब्ध व्हाव्यात, आपल्या संचिकेची सध्या स्थिती, सी.फ.सी केंद्रात नोंदवलेल्या तक्रारीचा स्थिती, या सर्व बाबींची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी टच स्क्रीन किओस्क या माध्यमाचा वापर करण्यात आला, व १२.५ % चे स्कॅन केलेल्या संचिका टच स्क्रीन किओस्क वर आपलोड करण्यात आलेले आहे.
१२.५ % भूमी विभागात किओस्क मध्ये काय पाहू शकता ?
किओस्क वर खालील तपशील पाहू शकता.
१) स्कॅन झालेली मूळ संचिका
२) १२.५ % सांचीका निर्गती अभियाना अंतर्गत तपासणीअंती आभिप्राय
३) तक्रार निवारण केंद्रात नोंदविलेल्या तक्रारीचा तपशील
४) १२.५ % संचिका निर्गती अभियानांतर्गत अधिसूचना
५) डॅशबोर्ड
६) नागरिकांचे आभिप्राय / सूचना
१२.५ % भूमी विभागाचा गाव निहाय संचिका निर्गती कार्यक्रम काय आहे ?
पारदर्शकता आराखड्याचा एक भाग म्हणून ‘१२.५ % संचिका निर्गती अभियान’ योजने अंतर्गत १२.५ % योजनेच्या प्रत्येक तालुक्यातील प्रलंबित संचिकांच्या आकलनाच्या आधारे संबंधित गावांची निवड करून त्यांची क्रमवारी लाऊन सर्व सांचीका निकाली काढण्यासाठी तसेच प्रलंबित सांचीका मार्गी लावण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याला १२.५ % संचिका निर्गती अभियान असे संबोधण्यात आले आहे.
संचिका निहाय व गाव निहाय माहीती कशी पाहता येईल ?
संचिका निहाय माहीती पाहण्यासाठी आपणास प्रथम भाषेची निवड करावी लागणार आहे. पुढे पहा या विकल्पाची निवड करून गावाचे नाव, सांचीका क्रमांका ची माहिती भरून आवश्यकतो पर्याय निवडावा.
स्कॅन संचिका म्हणजे कुठल्या संचिका किओस्क वर पाहता येतील?
१२.५ % भूमी व १२.५ % इस्टेट विभागातील स्कॅनींग पूर्ण झालेल्या सांचीका पाहता येतील.
किओस्क मध्ये आभिप्राय नोंदू शकता का ?
होय, मुख्य पानावर जाऊन "आभिप्राय" या बटनचा वापर करून स्वतः आपण आपला आभिप्राय किओस्क मध्ये भरून शकता किंवा समस्या निवारण केंद्राशी संपर्का साधू शकता.
मिळालेल्या माहिती बद्दल आपण संतुष्ट नसाल, संचिके मध्ये विसंगती आढळल्यास किंवा स्कॅन संचिका उपलब्द नसलेस काय करावे ?
अशा प्रसंगी आपण ‘समस्या निवारण केंद्राशी’ साधावा.
किओस्क हाताळताना आडचण येत असेल तर काय करावे ?
तक्रार निवारण केंद्रातील कर्मचार्याअशी संपर्क साधावा आणि कर्मचार्‍याची मदत घ्यावी.
माहिती पाहत आसताना किओस्क बंद झाला, हॅंग झाल्यास काय करावे ?
तक्रार निवारण केंद्रातील कर्मचार्याअशी संपर्का साधावा आणि कर्मचार्‍याची मदत घ्यावी.