साडेबारा टक्के भूमी विभागाची पारदर्शक प्रशासन योजना

"पारदर्शक प्रशासन" या ध्येयाकडे वाटचाल करणार्‍या सिडको महामंडळातर्फे आणखी एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या संचिकेची सध्यस्थिती जाणून घेण्यासाठी किंवा ती पाहणेसाठी सिडको कार्यालयाला वारंवार भेटी द्याव्या लागत होत्या. संचिका दाखवणेची कार्यवाही सिडको कर्मचाऱ्यावर अवलंबून राहू नये या करिता "१२.५ % योजनेमधील संचिकांचे" स्कॅनिंग करण्यात आले आहे. स्कॅन झालेल्या संचिकांचा तपशील खालील प्रमाणे आहे:

12.5% विभागाच्या स्कॅन झालेल्या संचिकांची सद्यस्थिती
भूमी 12.5% इस्टेट 12.5 %
एकूण संचिका एकूण पाने एकूण संचिका एकूण पाने
स्कॅन करावयाची संख्या 8,500 33,00,000 7,500 51,50,000
स्कॅन केलेली संख्या 8,667 47,50,510 2,012 13,35,335
स्कॅन करणेसाठी प्रलंबित -167 -14,50,510 5,488 38,14,665

या प्रयोजनांतर्गत स्कॅन झालेल्या संचिका सहजपणे नागरिकांना पहाण्यासाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठी टच स्क्रीन केओस्क या माध्यमाचा वापर करण्यात आला आहे. १२.५ % चे स्कॅन केलेल्या संचिका टच स्क्रीन केओस्क वर आपलोड करण्यात आलेले आहे.

 

टच स्क्रीन केओस्क वर नागरिक खालील माहिती पाहु शकतात.

१)     स्कॅन झालेली मूळ संचिका

२)     डेटा सेंटरचे छाननी पत्रक

३)     १२.५ % अभियान संचिका तपासणीअंती आभिप्राय

४)     तक्रार निवारण केंद्रात नोंदविलेल्या तक्रारीचा तपशील

५)     १२.५ % संचिका निर्गती अभियानांतर्गत अधिसूचना

६)     नागरिकांचे आभिप्राय / सूचना 

 

सुचना : किओस्कवर उपलब्ध असलेली माहिती केवळ पाहण्यासाठी आहे. यामध्ये काही विसंगती आढळल्यास कृपया तक्रार निवारण कक्षा कडे संपर्क साधावा. मुळ संचिकेतील माहिती ग्राह्य धरण्यात येईल.